बऱ्याचदा असंच होतं, आपल्यालाच माहिती नसतं-कळत नसतं आपल्याला नेमकं काय हवं आहे.
अशावेळी मानसतज्ज्ञाचा सल्ला, मार्गदर्शन तुम्हाला मोलाचं ठरू शकते.
काउन्सेलिंगमध्ये काय होतं?
मानसतज्ज्ञांकडे किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे फक्त 'वेडे' लोक जातात असा सर्वांचा समज असतो. खरं पाहिले तर रोजच थोड्याफार प्रमाणात मदतीची गरज सर्वांनाच असते. अशावेळेस आपल्याला कोणाशी तरी बोलून बरं वाटत असतं. अनेकदा आपण आपले मित्र-मैत्रिणी, पालक, शिक्षक यांच्याशी बोलून समस्यांवर उपाय शोधत असतो. मात्र अशी व्यवस्था नसेल आणि त्यांना सांगता येत नाहीत असे प्रश्न आपण काउन्सिलर आणि मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन जाऊ शकतो.
काउन्सेलिंगमध्ये कोणताही उपदेश केला जात नाही. तर तिथं व्यक्तीचं बोलणं ऐकून घेतलं जातं. त्यातील नकारात्मक विचार शोधून ते व्यक्तीला सांगितले जातात. त्या नकारात्मक भावना कमी कशा करायच्या त्यावर उपाय सुचवले जातात. वर्तनात काही बदल सुचवले जातात आणि त्यासाठी मदत केली जाते. मनोविकारतज्ज्ञ, तुमच्या एखाद्या समस्येसाठी वर्तन बदलासह औषधांचीही गरज असेल तर औषधं देतात.
डॉक्टरांकडे गेलो म्हणजे आपल्याला औषधे घ्यावीच लागतील असा समज करून घेऊ नये. तुम्हाला नक्की कोणत्या तीव्रतेचा त्रास आहे, त्रास नक्की कोणता आहे हे डॉक्टरच ठरवू शकतात. आपल्या मानसिक अवस्थेचं निदान आणि उपचार डॉक्टरांनाच करू द्यावं.