चिंता आणि ताण या सहज वापरता येणारे शब्द असले तरी त्याचे दूरगामी परिणाम मनावर होत असतात.
चिंता आणि ताणाबद्दल गैरसमज
आयुष्य हे चिंता करण्याचं, भरपूर ताणाचं आहे त्यामुळे ताण हा जीवनाचा भाग आहे असं समजून अनेक लोक जगत असतात. सतत ताण, स्पर्धा, तुलना, असमाधान, चिंता, मानसिक अशांतता हेच जीवन समजलं जातं. त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी ते अधिक गुंतागुंतीचे होत जातात. अनेक जण स्वतःच्या समस्यांचं स्वतःच निदान करतात. बोलताबोलता सरळ मला डिप्रेशन आलं आहे असं म्हणून मोकळं होतात. पण नैराश्य किंवा कोणत्याही मानसिक आजाराच्या संज्ञा सहज वापराव्यात इतक्या साध्या नाहीत. आपला ताण, आपल्या मानसिक आजाराच्या समस्या अनेक पातळ्यांवर असतात. त्यांचं निदान आणि उपचार करण्याचं काम आपण डॉक्टरांवरच सोपवलं पाहिजे.